Poems and articles

वाट.

विघ्ने अनेक माझ्या वाटेत होती,
सोसून सर्व, पाऊले चालत होती.

अपयशाचे, अपमानाचे, दुःखाचे,
सर्व वेदनेची काटे सोशीत होती.

कौतुक माझे च मी, न केले कधी,
सारी कथा माझी वाट बोलत होती.

माझ्या जखमांना ही सुगंध आला,
फुलांसारखी ती सारी फुलत होती.

संकटांना मी कधी नाही ना म्हणालो,
जरी हे सत्य होते की, ती छळत होती.

उन्हात जीवनाच्या मी नित्य तपलो,
वाट एक होती, पाऊले जळत होती…..NK









चाणाक्ष नजरेतून.

डोळे उघडे ठेऊन जगणाऱ्याला कोणत्याच गोष्टीची भीती नसते.जे सावध असतात त्यांना सर्व गोष्टींची चाळ लागते .मित्र कोण शत्रू कोण यांच्यातला ज्याला खरा फरक कळाला त्याला आयुष्यात जास्त भीती उरत नाही.
आपल्याच ताटात खाणारे आणि आपल्याच ताटात विष कालवणारे साप इथे कमी नाहीत.दोन भाकरीचे तुकडे असले तर कुत्रे ही जवळ येतील,तर अश्याच स्वार्थी माणसांचं काय वेगळी गोष्ट !
परंतु,एक फरक मात्र यांच्यात जाणवतो तो म्हणजे,कुत्रे बेइमानी कधी करणार नाहीत मग तो घरचा असो नाहीतर दारचा,मात्र माणूस त्याचा काय विस्वास?


तोंडावर गोड बोलणारे आणि मनात कपट ठेवणारे साप इथे खूप असतात.अश्या सापांना वेळीच ओळखून ठेचाव लागत ,नाहीतर हे तयार असतात आपल्याच दंश घ्यायला. वरवरून चांगला दिसणारा आत चांगला असेल याची काय खात्री? आणि वरून वाईट दिसणारे आत ही वाईट असेल याची ही काय खात्री ? रावणान सुधा सीतेला पळून नेताना एका ऋषीच रूप घेतल होत .
बाहेरची उंदर आणि घुशी ,आपण घरात शिरू देऊ नयेत.अश्या घुशी , उंदीर आपले घर उध्वस्त करायलाच बसलेले असतात.
कितीही भावनिक झालं तर अंत्करणातल्या गोष्टी कोणाला सांगू नये .
कारण ऐकणारा समजून च घेईल हे सांगता नाही येणार आणि समजल जरी तर तो कुणाला सांगणार नाही याची काय खात्री ?
आज मित्र वाटणारा उद्या शत्रू झाला तर ? स्वतःचे मनातले भेद कुणालाही कधी सांगू नये .त्यावर वेळोवेळी चिंतन करावं.अश्याने माणूस सतर्क राहीलच परंतु कोणत्याच घुशी,उंदीर ,कुत्रे आणि साप आपल काही बिघडू शकणार नाही …… —- निशिकांत कुटे.

राग

राग माणसाचा स्वाभाविक गुण. पण तो किती यावा ? कुठे यावा? कुणावर यावा? या गोष्टीला महत्व. लवकर राग येणारी माणसे, लवकर नियंत्रित करता येतात. ज्याला लवकर राग येतो, ती माणस सरळ आणि स्पष्ट असतात. अश्या माणसांच्या मनात जर कुणाबद्दल काही बर वाईट असेल तर ती माणसं झटकन बोलून जातात. ज्यांना राग येतो ती माणस दोन तोंडी नसतात. या उलट जी प्रत्येक गोष्टीला गोड बोलणारी, आपली री ओढणारी माणसं असतात ती आतून धृत असतात. अशी माणस म्हणजे तोंडावर लोणी आणि आत विष असलेले मटक. कधी कधी आपल्यावर चांगल्या गोष्टीसाठी राग करणाऱ्या व्यक्ती चा आपल्याला राग येतो. या वेळेस तो राग न धरता आपण आपल हित समजावं.या उलट मात्र काही माणसं ही गोड बोलून स्वतःचा स्वार्थ साधतात. ती माणस आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतात.
राग हा धोकादायक तर असतोच मात्र, तो काही ठिकाणी येणे तितकेच आवश्यक असतो. जिथे आपल्या स्वभिमानावर वार होतो तिथे राग रुपी शस्त्र वापराव च लागत. माणसाने नात्यात राग करताना एकदा विचार करावा की,”राग महत्वाचा आहे का ते नात महत्वाचं आहे”.
आपल्या माणसांवर रुसवा, राग जरी केला तरी तो दोन क्षणात विसरून जायला हवा. अश्याने नाते तुटत नाही, चुका कळतात. राग क्षणिक असतो मात्र प्रेम शास्वत आहे.
माणूस कधी कधी गर्वाने सांगत फिरतो,”आज मी याला अस बोलो, त्याला तसं सरळ केल”.तेव्हा तो चुकतो, रागाच्या आणि अभिमानाचा धुंदीत माणूस खूप वेळा अनपेक्षित बोलून जातो. त्या बोलण्याचा समोरच्या वर काय परिणाम होईल, याचा त्याला तिळमात्र ही अनुभव नसतो.अश्या वेळेस माणस तुटतात, दूर जातात. आणि इथेच आपल नुकसान होतं. मी ही खूप वेळा राग केला.राग स्वतःला अपायकारक आहे. रागान माणस दूर झाली, नाती तुटली. आणि एकदा तुटलेली माणस परत येत नसतं, मग सगळं अर्पण करायचं म्हटल तरीही. म्हणून म्हणतो राग नको. जरी ही समोरचा वाईट वागला, तोडून वागला, धोक्याने वागला, तर क्षणिक शांत डोक्याने विचार करा आणि मग निर्णय घ्या. रागात शब्द नको. रागात कोणते ही कार्य नको. :-.NK

माझे च प्रश्न आणि माझी च उत्तरे ..

माझे च प्रश्न आणि माझी च उत्तरे ,
माझ्या च जखमा आणि माझी च लक्तरे ,
माझ्या जगण्याची ही अशी व्यथा,
तुझ्या विना अधुरी ही माझी कथा .

माझे च शस्त्र माझे च वार ,
माझे च काळीज माझी च कट्यार ,
माझ्या च जखमा माझेच रक्त,
शेवटी उरलो एकटा मी फक्त .

माझे च अश्रू माझे च डोळे,
माझे च दुःख माझे च सोहळे ,
माझा च एकांत माझा अंत ,
तुझ्या विरहाची मजला खंत …NK






चारागो को बुझालो और अंधेरा बनालो .

चारागो को बुझालो और अंधेरा बनालो ,
में उजलता रहूंगा जरा मुझे आजमालो ।

कितना भी थमालो, कितना भी बचालो,
वक्त की तरह फिसलता रहूंगा मुझे आजमालों ।

चाहे घर जलादो या बस्तियां मिटालो ,
हर बार उभरता रहूंगा मुझे आजमालो ।

चाहे उजाला मिटादो या शब बुलालो,
हर सुबह निकलता रहूंगा मुझे आजमालो ।

कितना भी हरालो या सतालो ,
फिर भी जीतता रहूंगा मुझे आजमालों ।

मेरे उजालों, जहन के ख्वाबों खयालो ,
में चमकता रहूंगा मुझे आजमालों ।……..NK

चांद बाहो में है..

चांद बाहो में है, आसमां जल रहा है,
आज यहां सब कुछ बदल रहा है ।

मेरी निगाहें आसमान में भटकी हुई,
दिल मेरा यहां सीने में मचल रहा है ।

तु है बाहों में या है चांद कोई ,
मुझे कुछ भी नहीं पता चल रहा है ।

सितारों से चुराई है मैंने रोशनी ,
मेरा यार कितना उज़ल रहा है ।..NK

चंद्र ताऱ्यानो..

चंद्र ताऱ्यानो,या माझ्या सोबतीला,
घेऊ विसावा इथे आज रात्रीला .

दुःख, वेदना या, भोगू नको मना,
आनंदाने जगू आज या क्षणा.

आयुष्याचा प्रवास अती क्रूर आहे,
जवळ जे काल होते, आज दूर आहे.

नियतीच्या खेळांनी मी मजबूर आहे,
काळाच्या पुढे माझी हार आहे.

नभाच्या हिऱ्यानो या सोबतीला,
घेऊ विसावा इथे आज रात्रीला …NK


पुस्तक

माणसांच्या संगती पेक्षा आता मला पुस्तकांची संगत जास्त आवडायला लागली . या बदलाचं कारण समजण्याला मला जास्त वेळ नाही लागला. आयुष्याचा भूतकाळ जर डोकावून बघितला तर एक गोष्ट प्रकर्षाने मला जाणवली , ती म्हणजे माणसाप्रमाणे पुस्तकांनी माझी साथ कधी सोडली नाही.ती मग लहान असोत किंवा मोठी असोत.

पुस्तकांमध्ये मला कधी कोणता गर्व ,अभिमान , द्वेष ,इर्षा ,वासना आधळून नाही आल्या. पुस्तकांनी मला नेहमीच आधार दिला.
मला जर विचारले सर्वात चांगला मित्र कोण तर मी पुस्तकच म्हणेल .
आजही मला माझ्या खोलीत माणसानं पेक्षा पुस्तक जास्त जवळ वाटतात.पुस्तकांचा जो लळा मला लागलाय,तो अतूट आहे. या पुस्तकानं बदल एवढा जिव्हाळा का वाटावा असाही मला प्रश्न पडतो ?
मी जेव्हा जेव्हा काही नवीन वाचतो तेव्हा तेव्हा माझ्या रंध्रात मला नवीन चेतना जाणवतात . खरच एखाद्या वाचकांचं आणि पुस्तकाचं कसं अंतर्मन जुळत असेल?

लिहणारा लेखक जो काही लिहतो आणि वाचणारा वाचक जेव्हा ते वाचतो तेव्हा लेखकांचं आयुष्य वाचक जगत असतो .मग ज्याने जेवढी जास्त पुस्तके वाचली त्याने तेवढी आयुष्य जगली असच म्हणता येईल.
मग एका आयुष्यात एवढी आयुष्य जगण्याचं पुण्य कुणाला भेटत!
तर ते फक्तं वाचन करणाऱ्याला . आणि या सोबतच महत्वाचं म्हणजे प्रत्येकाचा अनुभव सुधा वाचायला मिळतो, ज्याने करून आपण वेळीच सावध होतो आणि आपणाला कमी ठेचा मिळतात .

खरच ज्याला वाचनाची गोडी लागली ना ,त्याला मग दुसऱ्या कशाची गोडी लागणं कठीण. वाचन हे असं मद्य आहे की ते ज्यांनी प्राशन केल ,त्याला त्याची नशा आयुष्य भर नाही उतरवता येणार . हे वाचन म्हणजे काळ्या रात्री मधे लखं प्रकाश देणार, संकटात मार्ग निर्माण करणार, वाट हरवलेल्या माणसाला दिशा दाखवणार ,तिमिरातून तेजाकडे नेणार असत. ज्याला याची गोडी लागली तो पावन च झाला समजायचं . असा मनुष्य मग क्वचितच आयुष्यात अपयशी होईल.
आणि झाला तरी त्याला पुन्हा यशस्वी व्ह्यायला वाचनचं बळ देईल…NK

वक्त !

सोचने में वक्त नहीं लगता,
करने में वक्त लगता है ।
मरने में वक्त नहीं लगता,
जीने में वक्त लगता है ।

जिंदगी पल भर की है,
तेरा मेरा भरोसा क्या ?
वक्त कभी ठहरता नहीं,
दो पल में जिले जरा ।

किसी के वास्ते यहां,
वक्त कहा रुकता है ।
मरने में वक्त नहीं लगता,
जीने में वक्त लगता है ।

सास आती है, सास जाती है,
जिंदगी है दो सासो का फासला ।
कल हम होंगे या ना होंगे ,
फिर भी चलता रहेगा ये सिलसिला ।

ज़िन्दगी की दौड़ में,
वक्त ना कभी थकता है,
मरने में वक्त नहीं लगता,
जीने में वक्त लगता है । …..NK