माझे च प्रश्न आणि माझी च उत्तरे ..

माझे च प्रश्न आणि माझी च उत्तरे ,
माझ्या च जखमा आणि माझी च लक्तरे ,
माझ्या जगण्याची ही अशी व्यथा,
तुझ्या विना अधुरी ही माझी कथा .

माझे च शस्त्र माझे च वार ,
माझे च काळीज माझी च कट्यार ,
माझ्या च जखमा माझेच रक्त,
शेवटी उरलो एकटा मी फक्त .

माझे च अश्रू माझे च डोळे,
माझे च दुःख माझे च सोहळे ,
माझा च एकांत माझा अंत ,
तुझ्या विरहाची मजला खंत …NK






One thought on “माझे च प्रश्न आणि माझी च उत्तरे ..”

Leave a Reply