राग माणसाचा स्वाभाविक गुण. पण तो किती यावा ? कुठे यावा? कुणावर यावा? या गोष्टीला महत्व. लवकर राग येणारी माणसे, लवकर नियंत्रित करता येतात. ज्याला लवकर राग येतो, ती माणस सरळ आणि स्पष्ट असतात. अश्या माणसांच्या मनात जर कुणाबद्दल काही बर वाईट असेल तर ती माणसं झटकन बोलून जातात. ज्यांना राग येतो ती माणस दोन तोंडी नसतात. या उलट जी प्रत्येक गोष्टीला गोड बोलणारी, आपली री ओढणारी माणसं असतात ती आतून धृत असतात. अशी माणस म्हणजे तोंडावर लोणी आणि आत विष असलेले मटक. कधी कधी आपल्यावर चांगल्या गोष्टीसाठी राग करणाऱ्या व्यक्ती चा आपल्याला राग येतो. या वेळेस तो राग न धरता आपण आपल हित समजावं.या उलट मात्र काही माणसं ही गोड बोलून स्वतःचा स्वार्थ साधतात. ती माणस आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतात.
राग हा धोकादायक तर असतोच मात्र, तो काही ठिकाणी येणे तितकेच आवश्यक असतो. जिथे आपल्या स्वभिमानावर वार होतो तिथे राग रुपी शस्त्र वापराव च लागत. माणसाने नात्यात राग करताना एकदा विचार करावा की,”राग महत्वाचा आहे का ते नात महत्वाचं आहे”.
आपल्या माणसांवर रुसवा, राग जरी केला तरी तो दोन क्षणात विसरून जायला हवा. अश्याने नाते तुटत नाही, चुका कळतात. राग क्षणिक असतो मात्र प्रेम शास्वत आहे.
माणूस कधी कधी गर्वाने सांगत फिरतो,”आज मी याला अस बोलो, त्याला तसं सरळ केल”.तेव्हा तो चुकतो, रागाच्या आणि अभिमानाचा धुंदीत माणूस खूप वेळा अनपेक्षित बोलून जातो. त्या बोलण्याचा समोरच्या वर काय परिणाम होईल, याचा त्याला तिळमात्र ही अनुभव नसतो.अश्या वेळेस माणस तुटतात, दूर जातात. आणि इथेच आपल नुकसान होतं. मी ही खूप वेळा राग केला.राग स्वतःला अपायकारक आहे. रागान माणस दूर झाली, नाती तुटली. आणि एकदा तुटलेली माणस परत येत नसतं, मग सगळं अर्पण करायचं म्हटल तरीही. म्हणून म्हणतो राग नको. जरी ही समोरचा वाईट वागला, तोडून वागला, धोक्याने वागला, तर क्षणिक शांत डोक्याने विचार करा आणि मग निर्णय घ्या. रागात शब्द नको. रागात कोणते ही कार्य नको. :-.NK
Khup Bhari Dada ❤️
LikeLiked by 1 person